१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची मोहीम: वैद्यकीय शिक्षण आयुक्तांचा टॉप-५ मध्ये समावेश
मुंबई, ता. ७ मे – महाराष्ट्र शासनाच्या ‘१०० दिवस कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम’ अंतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात वैद्यकीय शिक्षण आयुक्त कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सर्वोत्तम आयुक्त / संचालक या श्रेणीमध्ये वैद्यकीय शिक्षण आयुक्त यांचा प्रथम पाच क्रमांकात समावेश झाला आहे.
ही मोहीम शासकीय कार्यालयांमधील कार्यप्रणाली अधिक परिणामकारक, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात आली होती. त्यामध्ये कार्यालयीन प्रक्रियेतील सुधारणा, सेवा वितरणातील गती, डिजिटायझेशन, तक्रार निवारण, वेळेवर निर्णय प्रक्रिया आदी निकषांवर कार्यालयांची कामगिरी तपासण्यात आली.
वैद्यकीय शिक्षण आयुक्त कार्यालयाने या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी बजावून इतर विभागांसाठी आदर्श निर्माण केला आहे. या यशामुळे शासकीय वैद्यकीय शिक्षण व आरोग्य व्यवस्थापनाच्या बाबतीत प्रशासनाची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.